logo

वन एट क्रिकेट अकॅडमी नवोदितांसाठी प्रेरणादायी-पराग दहिवाल


क्रीक किंगडम अकॅडमीने रिसोड येथील वन एट क्रिकेट अकॅडमी सोबत सहकार्य करार केला असून क्रिक किंगडम अकॅडमी चे माध्यमातून या परिसरातील नवोदित क्रिकेटपटू ला एक चांगली संधी चालून आल्याची माहिती माजी सिंगापूर राष्ट्रीय खेळाडू व ग्लोबल डायरेक्टर,हेड ऑफ क्रिक किंगडम अकॅडमी चे पराग दहिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.रिसोड सारख्या ग्रामीण भागात वन एट अकॅडमीचे कार्य अतिशय प्रशंसनीय असून नवोदितांना घडविण्यासाठी अतिशय विधायक काम अकॅडमी कडून होत असून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन क्रिक किंगडम अकॅडमी चे पराग दहिवाल यांनी सांगितले.वन एट क्रिकेट अकॅडमी व क्रिक किंगडम अकॅडमी च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलाचे टॅलेंट शोधून त्यांना क्रिकेट च्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव होईल यासाठी शारीरिक चाचण्या, मोबाईल अप्लिकेशन व प्रगती अहवालाच्या माध्यमातून मुलाची प्रगतीचा संपूर्ण अहवाल पालकांना सांगण्यात येणार आहे,अकॅडमी च्या माध्यमातून फक्त क्रिकेट खेळाडूच तयार होत नसून फिटनेस ट्रेनर,कोच,फिजिओथेरपिस्ट व इतर माध्यमातून प्लेसमेंट मिळणार आहे.तरी पालकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पराग दहिवाल यांनी केले या पत्रकार परिषदेला पराग दहिवाल यांच्यासोबत पराग मडकईकर,माजी भारतीय खेळाडू भारतीय क्रिकेट संघ,उमेशजी गोस्वामी, व्यापारी महासंघाचे रिसोड चे अध्यक्ष मदन सेठ बगडीया,वन एट क्रिकेट अकॅडमी चे संचालक मयूर तायडे,अकॅडमी चे नवोदित खेळाडू व पालकांची उपस्थिती होती।

126
18661 views
  
6 shares